सर्व बातम्या

कृष्णा ज्ञानबा चौधरी यांना महाराष्ट्र शासनाचा ‘ग्रामोद्योग उद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ राज्यपालांच्या हस्ते प्रदान

|
Published On: November 4, 2026

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

राजभवन, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरामुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्रामोद्योग उद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळ्यात वाशिम येथील उद्योजक श्री. कृष्णा ज्ञानबा चौधरी यांना मानाचा ग्रामोद्योग भरारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील लोकभवन (राजभवन) दिनांक 3 नोव्हेंबर 26 रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, एमआयडीसी, वाशिम या उद्योगाच्या माध्यमातून उत्पादन व ग्रामोद्योग क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन कृष्णा चौधरी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्थानिक स्तरावर उद्योग उभारणी, उत्पादन निर्मिती, रोजगारनिर्मिती आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात आले.या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री माननीय नामदार श्री. उदय सामंत, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) महाराष्ट्र आयुक्त माननीय श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (भा.प्र.से.), आयुक्त सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालय msme महाराष्ट्र राज्य उद्योग राज्यमंत्री माननीय श्री. इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) माननीय श्री. रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव माननीय डॉ. पी. अनबलगन (भा.प्र.से.), विकास आयुक्त तथा उद्योग आयुक्तालयाच्या आयुक्त माननीय डॉ. पी अनबलगन(भा.प्र.से.) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.संघर्षातून उद्योगविश्वापर्यंतचा प्रवासकृष्णा ज्ञानबा चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचा उद्योग उभारण्याचा प्रवास सुरू केला. जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून CLEAN OUT या ब्रँडअंतर्गत स्वच्छता व आरोग्यविषयक विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उत्पादननिर्मिती, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.उद्योजकतेच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत ग्रामीण व स्थानिक उद्योगांना नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सन्मानामुळे वाशिम जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना कृष्णा चौधरी म्हणाले की, हा पुरस्कार केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमधील सर्व सहकारी, कर्मचारी, कुटुंबीय, मार्गदर्शक, हितचिंतक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीचा गौरव आहे. संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. हा पुरस्कार भविष्यात अधिक जोमाने उद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.कृष्णा चौधरी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल वाशिम जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.वाशिमच्या औद्योगिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.

Share News

Leave a Comment