सर्व बातम्या

विजयादशमीला आपट्याच्या पानांवर तंबाखूमुक्तीचा संदेश; बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सचा अनोखा उपक्रम

|
Published On: October 19, 2026

वाशिम, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : विजयादशमीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जनजागृतीची जोड देत श्री बाकलीवाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, वाशिम येथील एनसीसी कॅडेट्सनी आपट्याच्या पानांवर तंबाखूविरोधी संदेश लिहून अनोखा उपक्रम राबविला. पारंपरिक सणाच्या माध्यमातून तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण अधिकारी डॉ. आदित्य पांढारकर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा, बिडी आणि सिगारेटच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली.यावेळी डॉ. आदित्य पांढारकर यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगितले. तसेच सर्व एनसीसी कॅडेट्सनी तंबाखूमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा घेतली.तंबाखूविरोधी पोस्टर स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत अनुजा काकडे हिने प्रथम, श्रावणी आकरे हिने द्वितीय, तर समीक्षा घुगे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. गंगोत्री इंगळे आणि गणेश टेकाळे यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना डॉ. आदित्य पांढारकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमाचे विद्यालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षक किशोर राठोड तसेच शिक्षकवर्गाने कौतुक केले. विजयादशमीच्या परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला.

Share News

Leave a Comment