ग्रामवार्ता, मंगरूळपीर

हॅप्पीनेस प्रोग्राम शेलुबाजार येथे उत्साहात संपन्न

|
Published On: October 3, 2026

शेलुबाजार : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, शेलुबाजार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हॅप्पीनेस प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच अहिल्यादेवी होळकर हॉल, शेलुबाजार येथे संपन्न झाला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस प्रोग्राम हा शरीर, श्वास, मन आणि भावनांच्या स्तरावर काम करणारा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमामध्ये योगासने, प्राणायाम, ध्यान तसेच सुदर्शन क्रिया यांसारख्या साधनांचा समावेश करण्यात आला. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करून मनःशांती, सकारात्मकता आणि उत्साह वाढविण्यासाठी या साधनांचे मार्गदर्शन सहभागी साधकांना देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रशिक्षण श्री. सचिन भैय्या मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सहभागी साधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रियेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. पांडुरंग भाऊ कोठाळे, श्री. विलासभाऊ लांभाडे, श्री शाम भाऊ अपूर्वा, श्री. शंकर रवणे सर, श्री. सतीश येवले सर, श्री. निलेश लकडे सर, श्री. हिम्मतभाऊ पानभरे, श्री. राजभाऊ डांगे, श्री सागर भाऊ म्हैसने श्री. गोपालभाऊ हरणे, श्री. योगेशभाऊ येवले, श्री. अमरभाऊ जयस्वाल यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील अनेक सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी साधकांनी आयोजकांचे व मार्गदर्शकांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे शेलुबाजार परिसरात योग, ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक जीवनशैलीविषयी जनजागृती होण्यास मदत झाली.

Share News
मंगरूळपीर, वाशिम, शेलू बाजार

Leave a Comment